हैदराबाद प्रतिनिधी, दि.१० डिसेंबर२०२२ :- हैदराबाद येथील आतापुर मधील शिवाजीनगर भागात श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा नवयुवक मंडळ, व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, तसेच समस्त वारकरी भजनी मंडळ. अत्तापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे.
हा कार्यक्रम २५०० वाचकासह भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती , संत तुकाराम भजन मंडळ, आत्तापुर यांच्यातर्फे सर्व हैदराबाद मधील मराठी बांधवांना व भाविकांना आवाहन करण्यात येते की प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी ही श्री सद् गुरू धोंडोपंत दादांच्या कृपा आशीर्वादाने
अखंड हरिनाम सप्ताह २५०० वाजता सह भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री ह भ प कर्ण गजेंद्र भारती महाराज एकंबेकर यांच्या प्रेरणेने व ह भ प अवधूत महाराज एकंबेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील विद्वान व नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन आयोजित केले आहे तरीही या नाम सप्ताहाचा भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे असेल.
काकड आरती पहाटे ४:०० ते ६:०० ,श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सकाळी ६:०० ते९:०० ,श्री तुकाराम गाथा भजन सकाळी १०:०० ते १२:०० , प्रवचन संध्याकाळी ४:०० ते ६:०० , हरिपाठ संध्याकाळी ६:०० ते ७:०० , रात्री किर्तन ९:३० ते ११:३० , व हरिजागर रात्री १२:०० ते पहाटे ४:०० पर्यंत असेल. तर दररोज कीर्तनाची सेवा खालील प्रमाणे असेल.
रविवारी दि.११-१२-२०२२ रोजी, श्री ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन असणार आहे तर सोमवारी दि.१२-१२-२०२२ रोजी, श्री ह.भ.प. बंडातात्या कराडकर, मंगळवार दि.१३-१२-२०२२, श्री ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, बुधवार दि.१४-१२-२०२२, श्री ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर गुरुवार दि.१५-१२-२०२२, श्री ह.भ.प. अनिल पाटील बार्शीकर शुक्रवार दि.१६-१२-२०२२, श्री ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर
शनिवार दि.१७-१२-२०२२, श्री ह.भ.प. जयवंत महाराज बोधले तर परत रविवारी काल्याचे किर्तन श्री हभप. सद् गुरू कर्ण महाराज एकंबेकर यांचे होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा समस्त मराठी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आतापुर येथील समस्त भजनी मंडळी यांनी केले आहे.