नांदेड दि. १३ :- मोटार कार साठी एमएच-२६ -सीइ ही नविन मालिका शुक्रवार १६ डिसेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेल सह) अर्ज गुरुवार १५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २.३० पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास शुक्रवार १६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी केले आहे.