देगलूर प्रतिनिधी,दि.२२:- उप जिल्हा रुग्णलय देगलुर येथे कार्यरत डॉ. क्रांती शिलेदार अस्थिरोग विशेष तज्ञ यांची वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ या पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा गौरव व सत्कार डॉ. एस. एस. वलांडे वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय देगलुर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच आय. एम. ए. देगलूर च्या वतीने डॉ. कपील एकलारे यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. विश्वनाथ मलशेटवार, डॉ. अनिल थडके, डॉ. मुहम्मद उस्मान, डॉ. रवी काळे, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. संजय लाडके, डॉ. शेख मुजीब, डॉ. काझी सय्यद विजारत अली,गोपाळ बिडवई कंधारकर उपस्थित होते.