देगलूर प्रतिनिधी,दि. ०९:- देगलूर शहरात ड्रायव्हिंग स्कुलच्या नावाखाली अनेक व्यक्तीनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता आपल्या वैयक्तिक वाहनावर ड्रायव्हींग स्कुलच्या पाटया लाऊन बोगस ड्रायव्हींग स्कुलचा धंदा मोठया प्रमाणात सुरु केला असून जनतेकडून मोठया प्रमाणात पैसा उकळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
दरम्याण संबंधीत वाहन धारकांचे कोणत्याच प्रकारचे वाहन शिकवण्याचे परवाने नाहीत. किवा कोणतेही प्रशीक्षित परीक्षक नाहीत त्यामुळे लोकांच्या जिवीताचे कधी बरेवाईट होईल ते सांगता येत नाही. सदर वाहनधारकांमध्ये जुनी व अपरिपक्व वाहने वापरुन जनतेच्या जिवीताशी खेळल्या जात आहे. जुनी व कार्यकाळ संपलेली वाहने सर्रास बोर्ड लाऊन शिकाऊ लोकांना घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे.
त्वरीत भारतीय वाहन अधिनियमानुसार कार्यवाही करुन सदर प्रकार त्वरीत थांबवावा व होणारा मोठा अनुचीत प्रकार थांबवाण्याची मागणी विनोद बोरजे यांनी एका निवेदनाव्दारे केले आहे. सदर प्रकरण नियम बाह्य सुरू असलेल्या ड्रायव्हींग स्कुलवर व ड्रायव्हींग स्कुलच्या नावाखाली चालत असलेल्या वाहनांवर त्वरीत कार्यवाही न झाल्यास अंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा यावेळी त्यांनी दिले आहे.
दरम्याण त्यांनी निवेदनची प्रत मा. सचिव परिवहन विभाग मंत्रालय, मुंबई,
मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड, मा. अधिकारी कार्यालय देगलूर, मा. पोलिस निरीक्षक साहेब, पो.स्टेशन देगलूर येथे दिले आहेत.