मुंबई, दि. १५ – भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज रविवार दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी ध्वजारोहणाचा राज्य शासकीय मुख्य कार्यक्रम मंत्रालय प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात येईल.
कोविड-१९ ची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असून याचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमावरून https://youtu.be/xfMV8BMibMs या लिंकद्वारे पाहता येणार आहे.
विधान भवनात ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या दि. १५ ऑगस्ट रोजी मुंबई येथील विधान भवन परिसरात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
कोविड-१९ बाबतचे शासनाचे नियम पाळून सकाळी ८ वाजता विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.