ऑटोस्वारास लुटणाऱ्या टोळीस जेरबंद केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्याकडून गौरव

 

 

नांदेड प्रतिनिधी,दि.११ :-चार दिवसा पूर्वी  सिडको स्मशानभुमीच्या  रोडवर, नांदेड येथे, तीन आरोपीनी फिर्यादी हा अॅटोने राज कार्नर हुन मोंढयाच्या दिशेने निघाला असता अॅटो सिडको स्मशानभुमी कमानी जवळ गेला


असता अंदाजे २० ते २५ वय असलेले तिन अनोळखी इसम अचानक बुलेट मोटार सायकल वर समोरून आले व अॅटो समोर बुलेट मोटर सायकल थांबवुन तिघांनी ॲटो वाल्याला पैशाची मागनी केली व मारहाण केली तसेच अॅटोचे हेडलाईट व काचा फोडले फिर्यादी अॅटोच्या खाली उतरून जात असतांना आरोपीनी फिर्यादीस मागुन पकडले व फिर्यादीचे पॅन्टचे खिशातील ७००० /- रूपये

 

 

 

 

जबरीने काढुन घेतले फिर्यादीने विरोध केला असता आरोपीनी हातातील चाकुने फिर्यादीचे गळयावर वार करून जखमी केले व
विट उचलून फिर्यादीस फेकुन मारून जखमी केले. या बाबत फिर्यादी शेख मैनोद्दीन शेख राजेसाब, वय ४४ वर्षे, व्यवसाय हॉटेल चालक
रा. महाविर चौक, सिडको, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं ७४ / २०२३ कलम ३९४,३९७ भादवी कायदा
प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

 

 

पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथुन मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने जिल्हया मध्ये दरोडा प्रतिबंधक,
पेट्रोलिंग, मोटरसायकल पेट्रोलिंग सुरूकरण्यात आले आहेत. वरिल प्रमाणे घटना घडते वेळी दरोडा प्रतिबंधक वहान व कर्मचारी
तात्काळ घटनास्थळी पोहचुन गुन्हयात वापरलेले वहान व एक आरोपी जाग्यावरच पकडुन चागंली कामगीरी केली म्हणुन मा.

 

 

 

 

श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी १ दिलीप मुत्तेपराव श्रीमणवार श.वा. शा ईतवारा २ बालाजी बळीराम वाघमारे ३ श्रीनिवास दत्तात्रय रामोड ४ शेख मुजीबोधीन शेख फयाजोद्यीन सर्व नेमणुक पोलीस मुख्यालय नांदेड यांना कार्यालयात बोलवुन चागंली कामगीरी केल्या बदल प्रत्येकी पाचहजार रूपये बक्षीस व प्रमाणपत्र देवुन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *