देगलूर प्रतिनिधी, दि.१४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५६ वी श्रॉफ स्मृती वक्तृत्व स्पर्धा दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे
वक्तृत्व स्पर्धेचे विषय महामारीच्या काळात अर्थव्यवस्था व्यवस्थापित करणे , 2017 पर्यंत भारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे , विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्थेची बदलती भूमिका , वाढत्या सायबर गुन्ह्यांचा धोका आणि उपाय हे आहेत.
वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये अडीच हजार रू , द्वितीय पारितोषिक दीड हजार रू व तृतीय पारितोषिक आणि सर्वोत्कृष्ट पाच स्पीकर्सना प्रमाणपत्र देण्यात येईल .
प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धा केवळ वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी असुन उपरोक्त विषयातील कोणत्याही एका विषयावर इंग्रजी हिंदी किंवा मराठी भाषेत बोलू शकतात तीन या स्पर्धेसाठी स्पर्धकांना पाच मिनिटे बोलण्याची परवानगी देन्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ अशोक टिपरसे याँनी दिली आहे.