देगलूर प्रतिनिधी, दि.१४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर प्लेसमेंट सेल व एनआय आयटी मुंबई लिमिटेड आयसी आयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३/०२/२०२३ रोजी प्लेसमेंट व मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ होतें. एनआयआयटी,मुंबई लिमिटेडचे सहायक मॅनेजर श्री अक्षय मिसाळ प्रमुख मार्गदर्शक होते. प्रमूख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रत्नाकर लक्षटे यांनी केले. त्यांनी याकार्यक्रमाच्या आयोजन मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी केला. सदरील कार्यक्रम तीन भागात पार पडला. पहिल्या भागात अक्षय मिसाळ यांनी वेळ व्यवस्थापण व त्याची आवश्यकता? नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता आणि प्रक्रिया स्पष्ट केली. दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य तपासण्यासाठी सोशल मीडिया या विषयावर त्यांना निबंध लिहिण्यास दिला.
तिसऱ्या भागात श्री अक्षय मिसाळ, डॉ. आर. बी. लक्षटे, डॉ. संजय देबडे व डॉ. सुरेश काशिदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्त्व व भाषा
कौशल्य जाणून घेण्यासाठी मुलाखती घेतल्या.
यावेळी एकूण ४९ विद्यार्थ्यानी मुलाखती दिल्या. त्यानंतर अक्षय मिसाळ यांनी या मुलाखतीत १७ विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील बी. ए., बी. कॉम व बी. एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. संजय देबडे व आभार प्रदर्शन डॉ. सुरेश काशिदे यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी डॉ. रत्नाकर लक्षटे, डॉ. संजय देबडे, डॉ.राजकुमार पोकलवार व डॉ. सुरेश काशीदे यांनी परिश्रम घेतले.