नांदेड प्रतिनिधी,दि.२४ :- इंडियन ऑईल रेस क्रॉस इंडिया श्रीनगर ते कन्याकुमारी या ३६५१ KM सायकल रेस साठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे ४ अंमलदार हे रेस मध्ये सहभागी होत आहेत. यात पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री संतोष सोनसळे क्रिडाप्रमुख नांदेड, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री पुरुषोत्तम मोरे नाशिक ग्रा. पोलीस नाईक श्री हरिश्चंद्र मात्रे विशेष सुरक्षा विभाग औरंगाबाद, पोलीस कॉन्स्टेबल
श्री गौरव गजभिये नागपूर शहर हे महाराष्ट्र पोलीस सायकलींग स्कॉड संघातुन सहभागी झाले आहेत. संघास पोलीस अधीक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, नांदेड हे हजर होते.
सदरचा संघ हा टीम ऑफ फोर या प्रकारात खेळणार असून, त्यांना क्रू करण्यासाठी टेक्निशयन श्री सुमित मोकल, चीफ क्रु श्री सचिन खरे, श्री चैतन्य पल्लवे व ईतर ३ सहकारी सोबत आहेत.