नांदेड प्रतिनिधी,दि.२४ :- २३ फेब्रुवारी, २०२३ गुरुवार रोजी ‘संत गाडगे बाबा यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
या प्रसंगी मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पुष्पहार अर्पण करून संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले. या प्रसंगी श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, नांदेड यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन, सपोउपनि / सुर्यमान कागणे, पोहेकॉ / संजय सांगवीकर, मपोकों / शामका पवार, पोकॉ / विनोद भंडारे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.