हिमायतनगर प्रतिनिधी,दि.०३:- कामारी तालुका हिमायतनगर येथील शेतमजुरावर शेतात काम करतेवेळी रानडुकराने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, कामारी येथील शेतकरी श्री विनायकराव पाटील देवराई यांच्या शेतीमध्ये ऊस खुरपण्याचे काम करत असताना शेतमजूर ताई बाई गजानन बारडकर यांच्यावर सकाळी अकरा वाजता रानडुकराने जोराचा हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले आहे, त्यांच्यावर नांदेड आतील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे तसेच जखमी महिलाही अत्यंत गरीब व हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीची असल्यामुळे ताई बाई बारडकर यांना शासकीय तसेच समाजातील दानशूर मंडळींनी मदत करावे कारण त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या उपचाराचा खर्च मोठा आहे तरी दानसुरांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.