देगलूर प्रतिनिधी,दि.०३:- येथील कलावंत स्वर्गीय मदन देशपांडे यांच्या स्मृती पित्यर्थ दरवर्षी घेण्यात येणारा” मदन देशपांडे स्मृती संगीत समारोह” यंदा ही देगलूर येथे घेण्यात येणार आहे. दिनांक १२.३.२०२३ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वा. जिओ टावर जवळ दत्तनगर परिसरात आयोजित करण्यात आला असून .
या संगीत समारोहात नांदेड येथील गायिका सारिका गवारे- सरोदे यांचे गायन तसेच प्रकाश सोनकांबळे यांचे तबला वादन ; नांदेड येथील कलावंत सचिन गवारे यांचे संवादांनीवादन अशा विविध संगीत मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या समारोहात देगलूर येथील डॉ.जनार्दन भूमे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमासाठी इतिहास तज्ञ सुरेश जोंधळे;जेष्ठ गायक पंडित बाबुराव उप्पलवार देगलूर चे तहसीलदार राजाभाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी या संगीत समारंभाचा लाभ संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.