शेळगांव (गौरी) ता.नायगांव दि १६ : येथील सेवा सहकारी सोसायटी १५ अँगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक व शैक्षणिक उपकृम घेत असतात.यावर्षी नांदेडचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब याच्या वाढदिवसा निमित्त
साईदृष्टी नेत्रालय डॉ लेन नांदेड नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले.या शिबीरात पुरुष ११० तर महिला ७० व लहान बालक ३० आसे एकुण २१० रुग्णाची तपासणी करण्यात आली.
या नेत्ररोग शिबिरामध्ये सहभागी नेत्रचिकित्सक डॉ एस. जी. घोडके यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली आसुन आत्याधुनिक पद्धतीने रुग्णाची तपासणी केली. अल्प दरातील चष्मे नोंद करण्यात आले. यात काही रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन साठी त्यांचे ऑपरेशन साई दृष्टी नेत्रालय नांदेड येथे करण्यासाठी येणार आहेत.
या शिबिर कार्यक्रमाचे उदघाटक.सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर, उपसरपंच सौ.शालीनीताई राजेन्द्र पा.शेळगांवकर,डाँ.दत्तात्रय यादवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी सुधाकर पाटील,नागोराव पाटील,भाऊसाहेब पाटील,हाणमंत वाघमारे,निवृत्ती वाघमारे,नागनाथ टेकाळे,मनोहर पाटील,लक्ष्मण कांबळे,ग्रामविकास अधिकारी धनराज कत्ते,शिबीरातील कर्मचारी संतोष पा.घोडके याची उपस्थिती होती. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शेळगांव (गौरी) ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी.सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सुनिल रामदासी,सदस्य संतोष देशमुख,राजेश सुलेवाड,सय्यद सैलानीसाँब,तानाजी वाघमारे,अथर्व रामदासी. यानी विशेष परिश्रम घेतले.