येवती येथे शिवम् मिनरल वॉटर प्लांटचे उद्घाटन

 

 

मुखेड प्रतिनिधी,दि.०४:- मुखेड तालुक्यातील येवती येथे भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तथा मयुरी बार अँन्ड रेस्टॉरंटचे मालक रामभाऊ हिरमलवाड येवतीकर यांच्या शिवम् मिनरल वॉटर प्लांट व सप्लायर्सच्या दुकानाची ३ मार्च रोजी भव्य उद्घाटन करण्यात आले असून यावेळी गावातील अनेक मान्यवर व पत्रकार विठ्ठल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या फिल्टरचा उपयोग ग्रामिण भागातील लग्न समारंभासाठी होणार आहे.

माणसाच्या दररोजच्या दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय तर “शुध्द पाणी” असेच म्हणावे लागेल. कारण पाणी जर फिल्टर नसेल तर त्या पासून माणसाला अनेक आजार होऊ शकतात . प्रामुख्याने मुतखड्यासारखे दुर्धर आजार जास्त होत असतात. म्हणून दररोज माणसाने शुद्ध पाणी म्हणजे पाण्यासाठी फिल्टर पाण्याचा वापर केला पाहिजे.

 

 

 

 

 

हिच गरज लक्षात घेऊन रामभाऊ हिरमलवाड यांनी जनतेच्या सेवेसाठी नुकतच येवती बसस्टँड मयुरी बार अँन्ड रेस्टॉरंट येथे शिवम् मिनरल वॉटर प्लांटची ओपनिंग केली आहे.तरी नागरिकांनी घरगुती इतर कार्यक्रम व लग्न समारंभासाठी फिल्टर पाण्याची ऑर्डर निश्चित करण्यासाठी रामभाऊ हिरमलवाड यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन हिरमलवाड बंधु यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *