पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

 

 

धुळे, दि. ०८ :- धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी काल  अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या साक्री तालुक्यातील टिटाणे, खोरी, पेटले, दुसाणे भागाची पाहणी केली.

 

साक्री तालुक्यातील काही भागात सोमवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज या भागाचा दौरा केला.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसीलदार श्री. चव्हाण के. यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. महाजन यांनी अवकाळी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *