मित्रांगण ढोलताशा पथकाच्या वतीने गुढीपाडवा निमित्य भव्य शोभा यात्रा

 

 

 

हैद्राबाद प्रतिनिधी,दि.२२ :- हैद्राबाद येथील महाराष्ट्रीयांचा सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मित्रांगण संस्थेच्या वतीने आज शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात येत आहे.

हैद्राबादच्या महाराष्ट्रीयनांसाठी मित्रांगण संस्था गेली तीन वर्षे यशस्वीपणे या महोत्सवाचे आयोजन करत आहे. यावर्षी देखील २२ मार्च रोजी सायंकाळी ५:००  वाजता सी.सी.आर.टी, हायटेक सिटी येथून गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची मिरवणूक निघेल.

 

 

 

 

या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे यात सहभागी महिला महाराष्ट्रीयन पारंपरिक नऊवारी आणि पगडी परिधान करून रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलवर स्वार होणार आहेत. याशिवाय पुरुषही कुर्ता पायजमा, फेटा आणि पगडी घालून सहभागी होणार आहेत.

 

 

 

 

तसेच, गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे स्वागत “मराठी ढोल ताशा, लेझीम आणि वारकरी भजन मंडळासह परिपूर्ण मराठी शैलीत केले जाईल. तेलंगणातील मराठी समाजाची उपस्थिती नोंदवण्यासाठी आणि तिची संस्कृती आणि परंपरा पुढील तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांगण संस्थेचे संस्थापक अंबरीश लहानकर व मराठा मंडळ हैदराबाद चे सचिव लक्ष्मीकांत शिंदे यांनी समस्त मराठी बांधवाना उपस्थित रहान्याचे आवाहन केले आहे आधिक माहिती साठी या क्रमांकावर वर ९८४९८८७११५ संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *