नांदेड येथे “मन की बात, प्रवासी भाईयों के साथ ”संपन्न.

 

 

 

नांदेड प्रतिनिढत,दि.२७ :- देशाचे सर्वात यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या “मन की बात”हा कार्यक्रम नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे १६ वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित करून कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोना पासून संरक्षण व्हावे म्हणून सॅनिटायझर व पाण्याची बॉटलचे वितरण केले.

भाजप नांदेड जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या “मन की बात, प्रवासी भाईयों के साथ ” या कार्यक्रमात सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.यावेळी प्रवीण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू खोमणे,मन की बात प्रभारी शितल खांडील यांची समयोचीत भाषणे झाली.

 

 

 

 

 

बस स्थानक प्रमुख यासीन खान, कामगार आघाडीचे सुरेश लोट, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव,सहसंयोजक अक्षय अमिलकंठवार, युवा मोर्चा उपाध्यक्ष रोहित पाटील यांच्या हस्ते शेकडो प्रवाशांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश लोट यांनी तर आभार संतोष भारती यांनी केले.

 

 

 

 

 

 

दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत मन की बात चे अनेक कार्यक्रम घेतले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास वाडेकर,महेंद्र शिंदे,दीपक योगी,कपिल यादव,माधव लुटे, कैलास बरंडवाल, हमजा खान यांनी परिश्रम घेतले.पुढील महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात चा १०० वा कार्यक्रम असल्यामुळे मोठया प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले.

            please visit our new portal www.newsrajya.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *