पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार वितरण

 

 

 

अकोला दि.२८ :- महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. त्याअनुषंगाने सन २०१३-१४ ते २०१८-१९ या वर्षाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात मंगळवार दि. २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वितरीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर पुरस्कार याप्रमाणे : सन २०१३-१४ चा पुरस्कार डॉ. निर्मला पुंडलीकराव भामोदे, सन २०१४-१५ चा खुशबु महादेव चोपडे, सन २०१५-१६ चा ॲड. मनिषा नरेंद्र धुत व सन २०१८-१९ चा नेहा चक्रधर राऊत यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. पुरस्कार विजेतांना मानचिन्ह, शाल, श्रीफळ व १० हजार रुपयेचा धनादेश दिल्या जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *