‘शासकीय योजनांची जत्रा’ चित्ररथाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

 

 

 

यवतमाळ, दि.०१ मार्च :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘शासकीय योजनांची जत्रा’ चित्ररथाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्घाटन केले. तसेच हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

 

 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होत्या.

 

 

 

 

अनुसूचित जातीच्या नागरिकांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी म्हणुन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात कलापथक, चित्ररथ, रेडिओ जिंगल्स, फ्लेक्स, घडिपत्रिका इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येतो.

 

 

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी तयार करण्यात आलेला चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करुन घ्यावी असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *