सावरगाव (जिरे) व आसोला येथे सामाजिक न्याय पर्वानिमित्त दिलीसमाज कल्याणच्या योजनांची माहिती

वाशिम,दि.३ (जिमाका) जिल्ह्यात १ मेपर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम यांचे संयुक्त वतीने सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने वाशिम तालुक्यातील सावरगाव (जिरे) आणि आसोला येथे समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती २ एप्रिल रोजी उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे जनार्दन गायकवाड व नारायण बरडे यांनी उपस्थित गग्रामस्थांना योजनांची माहिती दिली.यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना,दिव्यांग बीज भांडवल योजना,दिव्यांग-अव्यंग विवाह योजना,सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना,आंतरजातीय विवाह योजना,जिल्हा परिषद सेस फंड योजना,वृध्दांकरीता वृध्दाश्रम योजना,अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीविकास योजना यासह अन्य योजनांचा सामावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *