देगलूर तालुक्यात खाजगी स्कूल व्हॅन ला अपघात ; सात विद्यार्थी जखमी

 

 

 

देगलूर (जि. नांदेड) दि.०९ :- एका खासगी वाहनामध्ये खानापूर येथुन शाळकरी विद्यार्थी घेऊन देगलूर येथील ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलकडे जाणारी व्हॅन पलटी होऊन सहा विद्यार्थी जखमी व एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी खानापूर फाट्याजवळ घडली. गंभीर जखमी विद्यार्थ्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

तालुक्यातील खानापूर गावातील काही विद्यार्थी देगलूर शहरातील ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतात. यासाठी काही पालकांनी मिळून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी एक खासगी वाहन लावले होते.

 

 

 

 

नेहमीप्रमाणे शनिवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी टाटा मॅजिक या वाहनाचा (क्रमांक एम.एच २६ ए एफ २४७३) चालक ज्ञानेश्वर विठ्ठलराव कल्याणी रा. धुप्पा, ता. नायगाव हा खानापूर येथून शाळकरी मुलं घेऊन उपरोक्त वाहनाद्वारे देगलूरातील रामपूर रोडस्थित ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलकडे निघाला असताना खानापूर फाट्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर व्हॅन खानापूर शिवारात पलटी झाली.

 

 

 

 

 

 

या अपघातात नवमी गावंडे, बालाजी काळेकर, शंतनु बेलगबुटे व अमर स्वामी हे इयत्ता पाचवीतील तसेच शेख रेहान मुजीब (वर्ग सातवा) व ममता मठवाले (वर्ग आठवा) असे सहा विद्यार्थी जखमी झाले. या विद्यार्थ्यावर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला असून शेख रेहान मुजीब या विद्यार्थ्याच्या डोक्यास मार लागल्याने येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर पाच विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागल्याने त्यांना घरी पाठवले असल्याचे सांगण्यात आले.

 

 

           please visit our new portal www.newsrajya.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *