प्रयागराज प्रतिनिधी,दि.१६ : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना दोन जणांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या.या दोघांना वैघकीय तपासणीसाठी नेले जात असताना मिडियाचे काही जण घटनास्थळी होते. या दोघांचे मृतदेह जमिनीवर पडल्याचे दिसून येते होते.
या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अतिक आणि अशरफचा मृतदेह घटनास्थळावरुन हलविण्यात आला. २००५ मधील उमेश पाल खून खटल्याच्या सुनावणीसाठी या दोघांना येथे आणण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या पोलिस चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद आणि एक साथीदार मारला गेला होता.