पो.स्टे. विमानतळ येथील खूनाचे प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी

नांदेड प्रतिनिधी,दि.२१ :- नांदेड शहरात पडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हयातील आरोपी अटक करण्यासाठी पथके तयार करन सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन विमानतळ गुरनं १०५/२०२३ कलम ३०७,३२५,३४१, ३२३,५०४,५०६,३४ भादंवि या गुन्हयात आरोपीतांनी फिर्यादी पास गंभीर जखमी केले होते. तेव्हा पासून गुन्हयातील आरोपी संतोष ऊर्फ चिग्या साईनाथ तरटे, राखाडे नगर, नांदेड हा हा फरार होता.

 

 

 

 

 

 

त्यास आज ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने यल गुन्हा साथीदारांसह केल्याचे कबुल केले आहे. आरोपी संतोष उर्फ चिया तरटे याचेवर यापूर्वी खून खूनाचा प्रयत्न जबरीचोरी व दरोडा असे (१३) गुन्हे दाखल आहेत. सदर नमूद आरोपीतास पुढील तपासकामी पो स्टे विमानतळ येथे देण्यात आले आहे.

 

 

 

 

सध्याची कामगिरी मा. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नाडेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड; श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्वगुणा, नांदेड, उपनिरीक्षक गोविंद मुंडे, उपनिरीक्षक संजय केंद्रे, उपनिरीक्षक मारोती तेलंग, पोहेकॉ सुरेश घुगे, पोहेकॉ. /संजॉय निकलवाड, पोको/तानाजी येळगे, मोतीराम पवार, पापको गंगाधर कदम आणि पोहेको दिपक ओढाणे यांनी नदी ओलांडली आहे. उपस्थित शिष्टमंडळाचे नेतृत्व मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *