जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बचतगटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणार- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

 

 

सातारा दि. २५ :-  बचतगटांसाठी त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग होणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मॉल उभारणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

शासकीय योजना संवेदनशिलतेने राबवाव्यात असे सांगून केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, बचतगटांना आवश्यक असणारी मदत करण्यासाठी शासन सज्ज आहे. घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना जमीन नसेल तर जमीन देण्यासाठी महसूल विभागाने कार्यवाही करावी. प्रधानमंत्री आवास योजनेस चालना देऊन गतीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

 

 

 

 

यावेळी श्री.  कराड यांनी स्वामित्व योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, पीएम किसान, सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम व बचतगट आदींचा आढावा घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *