देगलूर प्रतिनिधी,दि.२७ :- लख्खा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धनाजी जोशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
लख्खा येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशा विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनिल पाटील खानापूरकर मा जिल्हा परिषद सदस्य धनाजी जोशी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा शिवसेना जिल्हा चिटणीस सुभाष अल्लापुरकर, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कमलाकर उचले, सरपंच सुरेश पाटील मुंडकर, उपसरपंच ग्रामपंचायत लखा अमोल पाटील मुंडकर, सेवा सोसायटी
प्रतिनिधी माधव मंगरुळे, जयंती समिती अध्यक्ष लखा राजेश्वर नुचे, ग्रामपंचायत सचिव देवराव लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सम्रत बोयावार, मारुती उसकुलवार, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप राजुरे, ग्रा सदस्य मारुती मंगरूळे, नांदेड जिल्हा पोलीस सिध्दार्थ ढवळे यांच्या समवेत अनेक जणं उपस्थित होते.