महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी – ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर

 

 

मुंबई, दि. २९ :-  महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरोवोद्गार ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.

महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. राज्याच्या जडणघडणीचा हा प्रवास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्याकडून ‘ दिलखुलास’ कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.

 

 

 

 

 

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, सोमवार दि. १ मे, मंगळवार दि. २ मे २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *