देगलूर प्रतिनिधी,दि.२१ :- सकाळ चे देगलूर तालुका बातमीदार अनिल कदम यांना दुर्गादास सराफ प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिष्ठित समजला जाणारा दिवंगत माधव आंबुलगेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उत्कृष्ट वार्ता पुरस्कार शुक्रवार ता .१९ रोजी कंधार येथे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा मनोहर धोंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार ईश्वरराव भाेसीकर, माजी आमदार रोहिदासराव चव्हाण, मुक्तेश्वर धोंडगे सेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे ,सिनेअभिनेते अनिल मोरे, बालाजी पांडागळे, लोकपत्रे संपादक रवींद्र तहकीक, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देगलूर चे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अविनाशराव देशपांडे, जिल्हा डाकगृहाचे निवृत्त पीआरओ श्री गंगाधर गुंगेवार, समर्थ वाचनालयाचे ग्रंथपाल श्री पुंडलिक कदम यांची यावेळी उपस्थिती होती .श्री कदम यांनी सीमा भागातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला लेंडी आंतरराज्य मध्यम प्रकल्पाच्या विस्थापितांच्या प्रश्नावर चालवलेल्या वृत्त मालिकेला या लेखास हा पुरस्कार देण्यात आला.
श्री कदम यांना यापूर्वी मराठवाडा प्रतिष्ठान औरंगाबाद, उदगीर पत्रकार संघाचा विभागीय स्तरावरला उत्कृष्ट वार्ता पुरस्कार व दैनिक लोकपत्राचा विभागीय स्तरावर ला उत्कृष्ट वार्ता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातल्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.