देगलूर प्रतिनिधी दि.०१ :- महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असून देखील उच्च शिक्षणाचा दर्जा टिकवून सातत्याने यशाची परंपरा राखणारे ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय म्हणून देगलूर महाविद्यालयाची सर्वदूर ओळख आहे.
हे महाविद्यालय तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वार खुली करणारे एकमेव असे महाविद्यालय आहे .असे प्रतिपादन प्राचार्य डॉ मोहन खताळ यांनी केले लातूर विभागीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेबंरेकर होते. व्यासपीठावर सचिव शशिकांत शेठ चिद्रावार कार्यकारणी सदस्य देवेंद्र सेठ मोतेवार ,रवींद्रआप्पा द्याडे जनार्दनशेठ चिद्रावार यांची उपस्थिती होती.
दि ३१मे रोजी झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेतील यशस्वी विद्यार्थी सर्वप्रथम आलेला अमोल गडपवार ,राजकोटवार राजू, कु.साक्षी दिवटीवाड .
कला शाखेतील सर्वप्रथम विद्यार्थीनी श्रीदेवी वारे ,योगेश तोटावाड, दत्ता तालीमकर तसेच विज्ञान शाखेतून बारावी वर्गात सर्वप्रथम आलेला आवेस दौलताबादी ,महंमद सुफीयान कु.शिवानी देशमुख यांचा त्यांच्या पालकांसोबत हार पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
तपप्राचार्य चमकुडे यांनी मार्गदर्शन करणा-या सर्व क. म. शिक्षकांचा गौरव केला सातत्याने मेहनत घेतल्यास यश आपोआप येते असे मत व्यक्त केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ अधीक्षक गोविंद जोशी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य चमकुडे एम एम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. एस एन पाटील तर आभार प्रा.महेश कुलकर्णी यांनी मानले.