नांदेड जिल्हाध्यक्ष पदी प्रा.निळू पवार यांची निवड

 

 

 

मुखेड प्रतिनिधी दि.०६ :-  मुखेड तालुक्यातील पिंपळकुठा तांडा येथील रहिवासी असलेल्या प्रा. निळू पवार यांची समनक जनता पार्टीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मोठे अभिनंदन केले जात आहे.

समनक जनता पार्टीची नुकतच नांदेड येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडून यात पक्षाची राज्य व जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष म्हणून डॉ. रामकृष्ण कालावाड सर तर नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. निळू रत्ना पवार यांची निवड करण्यात आली असून प्रा. निळू पवार हे सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात .

 

 

 

 

 

 

त्यांनी आतापर्यंत बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवुन गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. ते स्वभावाने प्रेमळ व शांत संयमी वृत्तीचं एक पारदर्शक व्यक्तीमत्व आहे. सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान मोठे आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समनक जनता पार्टीच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *