नांदेड प्रतिनिधी,दि.२७ :- युवा सेना प्रमुख माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना विधानसभा प्रमुख महेश प्रकाश खेडकर यांच्यातर्फे नांदेड दक्षिण व उत्तर मतदार संघातील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना ३३ हजार वही व पेन वाटप करण्यात आले .
त्यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख गणेश मोरे ,तालुकाप्रमुख बाबुराव मोरे, युवा सेना शहर प्रमुख रवी नागरगोजे ,महेश जाकापुरे ,किसन फटाले ,, ऋषी वानखेडे,पप्पू बहिरे, नटराज ठाणेकर, करण इटकर, प्रभाकर सोनटक्के, पुरभाजी जाधव, सोनाजी जाधव ,भरत शंभरगावकर, राहुल जाधव व सर्व गावातील शिवसैनिक व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.