इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन; जिल्हा प्रशासनाकडून बँक खाते क्रमांक जाहीर

 

 

अलिबाग प्रतिनिधी, दि.२१ :- दि.१९ जुलै २०२३ रोजी खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इरशाळवाडी ता.खालापूर येथे दरड कोसळून मोठयाप्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून

पशुधनाचे व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी सामाजिक संस्था/ट्रस्ट/फाँऊंडेशन्स/सीएसआर/दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

 

 

 

 

 

ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund), • बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर :- ३८२२२८७२३०० , IFSC Code:-SBIN००००३०८या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.

 

 

 

 

 

 

ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत श्री.अजित नैराळे, मो.८३९०० ९००४० , खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी, मो.क्र.९९७५७५१०७६ यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *