पालकमंत्र्यांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट; अत्याधुनिक कक्ष उभारणार

 

 

रत्नागिरी प्रतिनिधी, दि.२३: पालकमंत्री उदय सामंत यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून पाहणी केली. अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले ८४६  ग्रामपंचायतीमध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे उद्घोषणा देऊन ग्रामस्थांपर्यंत संदेश पोहचला जातो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी इतर कामकाजाची माहिती देवून प्रात्यक्षिक दाखविले.

 

 

 

 

 

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, मुंबई आणि रायगडच्या धर्तीवर एक अत्याधुनिक साधनसामुग्रीने युक्त असा आपल्या जिल्ह्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभा करा. त्यासाठीचा संपूर्ण प्रस्ताव तयार करावा. या कक्षात आवश्यक मनुष्यबळ

 

 

 

 

 

देखील दिले जाईल. तसेच बांधकाम विभागाकडून आवश्यक तेथे कक्षाची दुरुस्ती, नुतनीकरण, रंगरंगोटी करुन घ्यावी. त्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार ज्योती वाघ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *