नांदेड प्रतिनिधी,दि.२८ जुलै :- येथील चिखलवाडी भागातील रहिवाशी व शीख समाजातील वयोवृद्ध नागरिक तसेच सुप्रसिद्ध तबला वादक सरदार भगतसिंघ स्व. दीवानसिंघ मेजर यांचे शुक्रवार, दि. २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुमारास
अल्पशा आजाराने निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय ६५ वर्षें होते. सरदार भगतसिंघ मेजर हे उत्कृष्ट कलावंत होते. त्यांना विविध वाद्य वाजविण्याची आवड होती. त्यांच्या निधानाने कला क्षेत्रालाही क्षति पोहचली आहे. ते धार्मिक प्रवृत्तीचे होते व गुरुद्वारातून निघणाऱ्या विविध धार्मिक मिरवणुकीत ते भजन कीर्तनात केंद्र बिंदु
राहायचे. त्यांच्या निधानाने शीख समाजात व मित्र परिवारातून शोक व्यक्त केला जात आहे. शनिवार, दि. २९ रोजी सकाळी १० वाजता त्यांचे राहते घर चिखलवाडी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. नगीनाघाट येथील शमशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती त्यांच्या कुटुम्बियानी दिली आहे.