स्मृतीशेष तलवारे सर यांचा २५ वा स्मृतिदिन संपन्न

नांदेड प्रतिनिधि दि.२२ :  जिल्ह्य़ात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान असलेले,किनवट व बिलोली येथील दोनवेळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बडुर ता.बिलोली येथील मुख्याध्यापक स्मृतीशेष व्हि.एल.तलवारे सर यांचा २५वा स्मृतिदिनानिमित्त कोविड ञिसुञीचे पालन करीत बिलोली येथील व्हि.एल.तलवारे स्मृतीभवन येथील समाधीस्थळी त्यांच्या पत्नी कमल विठ्ठलराव तलवारे यांच्या हस्ते पुजा करून संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार अॅड.गंगाधर पटणे,सुप्रसिद्ध विधिज्ञ गुरूराज पालदेवार, जेष्ठ पत्रकार आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त सूर्यकांत पटणे,माजी ऊपनगराध्यक्ष गौसोद्दिन कुरेशी,आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डाॅ.सिध्दोधन कांबळे,पंचायत समिती बिलोलीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,किनवट येथील संस्थापक प्रल्हाद नाईक,देगलूर येथील अ‍ॅक्सिस बँकेचे कर्मचारी सचिन कांबळे,शैलेश सूर्यवंशी,बालाजी स्वीट मार्टचे मालक श्रीकांत मुंडकर,औरंगाबाद येथील गाडगे महाराज नावाने प्रसिद्ध असलेले राजू साबळे,क्रांतीसेनेचे प्रमुख मनोहर कंजे,शिघ्रकवी माधव सोनकांबळे ,सर्पमित्र विजयकुमार गुप्ता,सोसायटीचे सचिव अनंतराव खानापूरकर, सामाजीक कार्यकर्ते हनमंत भालेराव, सिध्दार्थ पवार,रविराज केसराळीकर, नागनाथ पवार,गंगासागर ईबितवार, तलवारे परिवारातील रमा तलवारे,प्रा.पंचशिला तलवारे,पवन तलवारे,विश्वजीत तलवारे,आदेश तलवारे,दृष्टांत तलवारे,पार्थ तलवारे,शुभम कंजे,सुशांत जेना आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.
निमंञीत पाहुणे व उपस्थितांनी तलवारे सर यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण केले आणि भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *