देगलूर प्रतिनिधी,दि.३० :- महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा देगलूर-बिदर महामार्गावर करडखेड-मरखेल अंतर्गत खूप मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
या खड्यांमुळे दुर्घटनाही वाढल्या आहेत. असंवेदनशील शासन व प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे (BRS) कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये बेशरम लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी
संतप्त नागरिकांनी शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध केला. या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती नाही झाली तर परिसरातील नागरिकांना संघटीत करून रास्ता रोको व यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कैलास येसगे यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे निखिल जाधव ठाणेकर, श्रीकांत मोखेडे, बालाजी इबितदार, पत्रकार चंद्रकांत गज्जलवार वळगकर,मोहसीन माळेगावकर, माधव झुडपे, दिपक रेड्डी, संदिप पाटील, अंबादास पवार, प्रल्हाद जाधव, शंकर शिळवणे,
विनोद राठोड, संतोष पवार, रवी राठोड, आकाश जाधव, अमोल पवार, सतिष पाटील, देविदास तलवारे सह करडखेड, मरखेल, केदारकुंठा व मरखेल तांडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.