हैदराबाद प्रतिनिधी, दि.१७ :- हैदराबाद येथील अंबर पेठ मंडळामधील पटेल नगर भागात भाग्यनगर गणेश उत्सव समितीचे संघटक जी आनंदगाव यांच्या अध्यक्षतेखाली मागील सहा वर्षांपासून इको फ्रेंडली गणेश मूर्तीचे वाटप करून
नागरिकांमध्ये प्रदूषण रहित गणेश मूर्ती स्थापन केल्या जाण्या साठी व परिसरातील नागरिक पर्यावरण प्रेमी व्हावे या उद्देशाने शेकडो गणेश मूर्तीचे वाटप दरवर्षी करतात.
त्याच अनुषंगाने काल दि.१६रोजी त्यांनी गणेश मूर्तीचे वाटप केले.
त्यात त्यांच्या समावेत श्री भिक्षापती, अनिल, शिनू, जी. ईश्वर,मल्लिकार्जुन, श्रीकांत, आणि विनोद यांनी देखील विशेष परिश्रम घेतले.