देगलूर प्रतिनिधी, दि.०२ :- श्री साईबाबाच्या पुण्य भूमी शिर्डीतील सामाजिक व विविध अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना दरवर्षी प्रहार पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यंदा संस्थेच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय उपसंचालक डॉ. प्रीतम वडगावे यांना “प्रहार” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबा समाजसेवेचा वारसा जोपासत शिर्डी शहरातील विविध क्षेत्रातील सात मान्यवरांना ही यावर्षी प्रहार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदरील प्रहार पुरस्कार विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत डॉ. सुरेश सोनवणे हे उपस्थित होते. शिर्डी येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. प्रीतम वडगावे हे मूळचे देगलूर चे भूमिपुत्र आहेत यामुळे देगलूर
शहरासाठी एक मानाचा तुरा त्यांनी खोवला आहे. या अशा यशाबद्दल त्यांचे शहरातील मित्र गंगाधर दाऊलवार प्रा.महेश कुडलीकर मित्र परिवाराकडून कौतुक करण्यात येत आहे सदरील कार्यक्रमात शिर्डीच्या इतरही सात जणांचा समावेश करण्यात येऊन त्यांनाही प्रहार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.