देगलूर प्रतिनिधी दि.२६ :- आज दि.२६ जानेवारी २४ रोजी परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर,स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत रेखावार,कार्यवाह प्रकाश चिंतावार,सहकार्यवाह गिरीश
गोळे,स्थानिक सदस्य डॉ.विनायक मुंडे, गणेश काप्रतवार ,भागवत तम्मेवार, शिल्पा अटकळीकर, अनुराधा गोळे द्वेय मुख्याध्यापक बाला साहेब केंद्रे,दमन देगावकर व पालक उपस्थित होते.
मा.डॉ.सुरेंद्र आलुरकर यांच्याहस्ते ध्वज फडकविन्यात आले व श्रीफळ वाढवून मान्यवरांच्याहस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी
महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व परम पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचेपूजन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ समजावत प्रजा व सत्ता म्हणजे नेमके काय? याची जाणीव सर्वांना करून दिले.
यानंतर आजच्या दिनाचे महत्व विद्यालयाचे सहशिक्षक यांनी भानुदास शेळके यांनी मुलांना सांगितले.या दिनानिमित्त विद्यालयात गेल्या पाच दिवसांपासून घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण सचिन जाधव यांनी तर माध्यमिक विद्यालयाचे बक्षीस वितरण सुजित मुगटकर यांनी केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे नृत्य व डंबेल्स सादर केले.यानंतर सर्व उपस्थित पालक व मुलांना राजगिरा लाडू खाऊ म्हणून वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी पदय वसंत वाघमारे यांनी तर ऋणनिर्देश ,सूत्रसंचालन रूपा पांचारे यांनी केले.