देगलूर प्रतिनिधी, दि.०८:- परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात स्कॉलरशिप पूर्वतयारी संदर्भात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक देगावकर दमन प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले शालेय समिती अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर, महिला पालक प्रतिनिधी शामा बिरादार तसेच अभ्यासक्रम मंडळ प्रमुख जाधव सचिन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.हेडगेवार व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर अभ्यासक्रम मंडळ प्रमुख जाधव सचिन यांनी पाचवी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा या संदर्भात पालकांना सखोल असे मार्गदर्शन केले.
यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी केव्हा व कशी करून घ्यावी तसेच प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ कशा पद्धतीने द्यावा स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासून जर करून घेतली तर दिवाळीपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण होऊन आपल्याला त्या विषयाला जास्तीत जास्त वेळ देता येईल असे त्यांनी सांगण्यात आले.
तसेच प्रत्येक परीक्षा ही किती गुणांची असते व प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतात आणि त्यानुसार आपण जर योग्य व सुनियोजित नियोजन केले तर निश्चितच आपल्या विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक बनेल असे देखील सांगण्यात आले.
यानंतर पालक चर्चा झाली पालक चर्चेमध्ये काही पालकांनी प्रश्न विचारले व त्याचे योग्य ते समाधान या पालक मेळाव्यात करण्यात आले.
यानंतर अध्यक्षीय समारोपात विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी पहिली ते चौथी अभ्यास करण्याची पद्धत व पाचवीच्या पुढे अभ्यास करण्याची पद्धत कशी असते हे समजावून सांगितले.
प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसले पाहिजेत. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्या लाड पुरवतो तसे अभ्यासासंदर्भात विचारणा करावी ,तसेच दिवसभराचे वेळापत्रक ठरवून द्यावे.
त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना तो अधिक चांगल्या पद्धतीने फायदा होईल. असेही त्यांनी पालकांना सांगितले.
तसेच पाचवी स्कॉलरशिप व नवोदय पूर्वतयारी या संदर्भामध्ये पाडव्याच्या शुभ मुहूर्ताचा योग साधून दिनांक दहा तारखेपासून यासंदर्भात आपल्या तासिका सुरू करण्यात येतील व आपण सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना या तासिकेला पाठवून द्यावे असे पालकांना विनंती केली.
शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.