नांदेड प्रतिनिधी, दि. १३ :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ५ मे व १४ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. मात्र निवडणूक व इतर कारणास्तव या राष्ट्रीय लोकअदालत तहकूब करण्यात आल्या आहेत.
५ मे २०२४ रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत २७ जुलै २०२४ रोजी तर १४ सप्टेंबर २०२४ रोजीची लोक अदालत २८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद सर्व संबंधितानी घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज यांनी केले आहे.