देगलूर प्रतिनिधी दि.१४ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व श्री समर्थ वाचनालय, देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने एम ओ यू अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सलग १८ तास वाचन या उपक्रमाचे आयोजन देगलूर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात करण्यात आले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार होते. प्रमुख पाहुणे समर्थ वाचनाएलयाचे सचिव अविनाश देसाई हसनाळकर व कोषाध्यक्ष देवेंद्र मोतेवार तसेच देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य
प्रा. उत्तमकुमार कांबळे पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, डॉ. बालाजी कत्तुरवार, ग्रंथपाल, डॉ. साईनाथ शिंदे, सहायक ग्रंथपाल श्रीनिवास नाईक, समर्थ वाचनालयाचे ग्रंथपाल पुंडलिक कदम, दीपक संगमकर, बालाजी गोविंदवार, ईळेगावकर रेखा व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मतदानाची शपथ देण्यात आली.
दिनांक १२/०४/२०२४ रोजी सकाळी ०५:०० पासून रात्री ११:०० वा. पर्यन्त विद्यार्थ्यांनी सलग १८ तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या उपक्रमात एकूण ५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.