नांदेड दि. १६ एप्रिलः – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती १४ एप्रिल, २०२४ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली . जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मनपाचे आयुक्त महेश डोईफोडे यांचे समवेत सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच उपस्थित नागरीकांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त कार्यालयास व कार्यालय परिसरात रोषणाई करण्यात आली. कार्यालयाच्या प्रागंणात रांगोळी काढण्यात आली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यालयात सामुहीक बौध्द वंदना घेण्यात आली. तसेच समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत अनु.जाती. मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करुन जयंती निमित्त अभ्यासवर्ग, निबंध ,चित्रकला , प्रश्न मंजूषा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.