हैदराबाद मधे , विदुषी मालिनीताई राजुरकर विशेषांक , प्रकाशन समारंभ.

हैदराबाद दि.०७ :-  , मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद, येथे मालिनीताई राजुरकर विशेषांकाचा प्रकाशन समारंभ थाटात संपन्न झाला. विशेषांकाचे प्रकाशन, सवाई गंधर्व महोत्सवात, पुणे येथे सातत्याने ३१ वर्ष ज्यांनी निवेदन केले , त्या आनंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमाची सुरुवात मुक्ता धर्म यांच्या सरस्वती वंदनेने झाली. पाहुणे आनंद देशमुख यांचा परिचय मराठी साहित्य परिषद हैदराबाद च्या कार्यवाह, शैलजा जोशी यांनी करून दिला. आनंद देशमुख यांचे स्वागत मराठी साहित्य परिषद, तेलगंण राज्य, हैदराबाद याच्या अध्यक्ष विद्या देवधर यांनी केले.

 

 

 

 

या विशेषांकाचा परिचय, मराठी साहित्य परिषद, कार्यकारिणीतील सदस्य, अरुण डवलेकर यांनी करून दिला. विशेषांकातील सर्व लेखकांचा सत्कार, आनंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
आनंद देशमुख यांनी त्यांच्या भाषणात मालिनीताई राजुरकर यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच इतर नामवंत कलाकार जसे

 

 

भारतरत्न भीमसेन जोशी, संतुरवादक शिवकुमार शर्मा, बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, गानसरस्वती प्रभा अत्रे यांच्या आठवणी सांगितल्या. नवोदित निवेदकांना, उत्तम निवेदन करण्यासाठी काय करावे लागते ते आपल्याला आलेल्या अनुभवातून छान समजावून सांगितले.

 

 

 

 

विद्या देवधर यांनी अध्यक्षीय भाषणात पंचधारा त्रैमासिकाची माहिती दिली व हा ९० वा विशेषांक आहे असे सांगितले . पुढील त्रैमासिकाचा अंक हा शिवाजी महाराज व बृहन्महाराष्ट्रातील त्यांचे कार्य हा विशेषांक असणार असे घोषित केले. आभार प्रदर्शन ही त्यांनीच केले.

 

 

कार्यक्रमाचा शेवट भैरवी गाऊन मुक्ता धर्म यांनी केला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन उज्ज्वला धर्म यांनी केले.