धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २३ व्या अमरनाथ यात्रेला ९० यात्रेकरूंचा पहिला जत्था नांदेड येथून उद्या रवाना.

 

नांदेड प्रतिनिधी, दि.०४:- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २३ व्या अमरनाथ यात्रेला ९० यात्रेकरूंचा पहिला जत्था शुक्रवार दि.५ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता हमसफर एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावरून रवाना होणार असून १३ दिवसाच्या यात्रेदरम्यान अनेकांनी प्रत्येकी एका भोजनाची व्यवस्था केली आहे.

२२ वेळा अमरनाथ चे तर २५ वेळा वैष्णोदेवी आणि स्वर्ण मंदिर अमृतसरचे दर्शन घेण्याचा विक्रम दिलीप ठाकूर यांच्या नावावर आहे. यावर्षी देखील जुलै महिन्यात दोन वेळा ते अमरनाथ यात्रेला जात आहेत.अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने दोन महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. नांदेड ते रत्नेश्वरी पदयात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात येते.

 

 

 

 

 

 

प्रकारची तयारी भारतात फक्त नांदेडमध्येच अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात येते.१३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, दिल्ली, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या यात्रेत अनेक दानशूर नागरिक अन्नदान करतात.

 

 

 

 

 

 

 

 

अमरनाथ येथे तर शेकडो लंगर मध्ये अखंडितपणे एक महिना विविध मिठाई असलेल्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली असते. प्रवासादरम्यान नांदेडच्या यात्रेकरूसाठी नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, मनोज शर्मा नागपूर,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड जम्मू,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,सरदार जागीरसिंघ अमृतसर,हास्य कवि सरदार प्रताप फौजदार, नारायण

 

 

 

 

 

,

 

अमोल गोळे अकोला, रेखा भताने, वंदना सुरेश त्रिमुखे हे दरवर्षी प्रत्येकी एका भोजनाची व्यवस्था करतात. याशिवाय चंद्रकांत कदम, डॉ.अजयसिंह ठाकूर पूर्णा,स्नेहलता जायसवाल हैदराबाद,प्रदीप शुक्ला भोपाळ, द्वारकादास अग्रवाल, प्रियंका गजानन मामिडवार,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना, वसंतराव कल्याणकर, आनंद साताळे,व्यंकटराव वायगावकर यांनी एका

 

 

 

 

 

 

 

 

ठिकाणी अल्पोहाराची व्यवस्था केली आहे. नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी देण्यात आल्या आहेत. रोमांचकारी असणाऱ्या अमरनाथ यात्रेदरम्यान चा दैनंदिन वृत्तांत अमरनाथच्या गुहेतून या सदरात दररोज प्रकाशित होणार आहे.

 

 

 

 

 

 

शुक्रवारी सकाळी यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघातर्फे करण्यात आले आहे.