हैदराबाद प्रतिनिधी,दि.११:-हैदराबाद येथील बाचे पल्ली येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी व फार्मसी स्टुडन्स अल्युमिनी असोसिएशन निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. संस्थाध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच् या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी उद्योजक रमेश रेडडी,हे होते. श्रीराम एन., डॉ. व्ही प्रसाद, महेश उटगे, संजयकुमार, हावगी डोंगरे, नागराज, अंतेश्- वर पटवारी, डॉ अशिष मेहता, डॉ. ज्ञानेश्वर काळे, सदानंद येरोळे यांची उपस्थिती.
होती. हैद्राबाद हे शहर देशात फार्मा उद्योगात अग्रेसर असून येथे अनेक नामांकित फार्मा कंपनीचे उद्योग आहेत. या फार्मा कंपनीत महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. माजी विद्यार्थी आणि सध्या महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी व तसेच फार्मसी शिक्षण घेत असलेल् या नविन विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यासाठी
एकाच वेळी महाविद्यालयात उपस्थित रहाणे शक्य नसल्याने हा माजी विद्यार्थी मेळावा हैद्राबाद येथे घेण्यात आला. मेळाव्यात प्राचार्य डॉ. एस एस पाटील म्हणाले की, महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयाने मागील चाळीस वर्षापासून आपला गुणवत्तेचा आलेख उंचावत ठेवला असून सातत्- याने महाविद्यालय
प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. यावेळी डॉ. प्रसाद, रमेश रेडडी, डॉ. अशिष मेहता, नागराज, सदानंद येरोळे, संजयकुमार, श्रीराम हावगी डोंगरे, गजानन लवंद, महेश उटगे, अंतेशवर पटवारी, डॉ. ज्ञानेश्वर काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे व अध्यापनामुळे आम् ही आनेक नामांकीत फार्माकंपनीत उच्च पदावर काम करीत आहोत.
या पुढील काळात या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थंना आम्ही व्यवसाय व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्याचे यूट्यूब लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपन करण्यात आले होते. मेळाव्याचे प्रास्तावीक प्रा. सुनिल गरड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. चंद्रवदन पांचाळ यांनी केले तर आभार प्रा. इरशाद शेख यांनी केले.
या मेळाव्यास १०१ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस् वीतेसाठी उद्योजक रमेश रेडडी, महेश उटगे, गजानन लवंद यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.