अ. व्या. शिक्षण संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार यांचे निधन

 

देगलूर दि.३१ :-अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव शशिकांत नारायणराव चिद्रावार ( वय ६७) यांचे दि. ३०/०७/२०२४ रोज़ी पहाटे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.
अंत्यविधी दि. ३०/०७/२०२४ रोजी सायंकाळी सार्वजनिक स्मशान भूमी देगलूर येथे झाला आहे.

याप्रसंगी शोकसभेत
निजामबादचे आमदार श्री सूर्यनारायणजी धनपाल गुप्ता , किरण नारायणराव चिद्रावार, माजी सिव्हील सर्जन डॉ. जमदाडे सर , देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे यांनी श्रद्धांजली वाहली.

 

 

 

 

 

 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले डॉ. राघवेंद्र व गुरुराज चिद्रावार , सुना , एक मुलगी व भाऊ डॉ. रवींद्र चिद्रावार, किरण चिद्रावार, प्रकाश चिद्रावार, अरुण चिद्रावार यांच्यासह नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

 

या प्रसंगी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश निवृत्तीराव पाटील बेम्बरेकर,
उपाध्यक्ष जनार्धन जयराम चिद्रावार, सहसचिव राजकुमार राम महाजन, कोषाध्यक्ष विलास शंकरराव तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉ. कर्मवीर पोशट्टी उनग्रतवार, नारायणराव रामन्ना मैलागिरे, सूर्यकांत गोविंद नारलावार, रविंद्र काशिनाथअप्पा द्याडे, चंद्रकांत राजन्ना

नारलावार, गुरूराज शशिकांत चिद्रावार, विजय पोशट्टी उनग्रतवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी व शहरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.