परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयातर्फे पोतराज वस्तीत केले फराळाचे वाटप

 

देगलूर प्रतिनिधी दि.२७ :- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयातर्फे सामाजिक बांधिलकी जपत देगलूर येथे दि.२६/१०/२०२४ वार- शनिवार रोजी पोतराज वस्तीत प्रत्यक्ष जाऊन दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.

हा आगळावेगळा उपक्रम विस्तार सेवाकार्य प्रमुख विकास देशमुख,तसेच सहप्रमुख भानुदास शेळके यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले.इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थी यात सक्रिय सहभाग नोंदवला.सर्व शिक्षक व स्थानिक पदाधिकारी यांच्या आर्थिक मदतीने सहा प्रकारचा चिवडा व मोतीचुर लाडू याची खरेदी करण्यातआले.त्यानंतर त्या फराळाचे पाकिटे शिक्षकांच्या सहकार्याने व्यवस्थित पॅक करून पोतराज वस्तीत देण्यात आले.

 

 

 

 

 

 

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर दातृत्व व भावनिक विकास असे संस्कार बिंबवण्यात आले.पालकांचाही या संपूर्ण उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता.


या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.श्री भागवतजी तम्मेवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दमन देगावकर,विद्यार्थी प्रतिनिधी,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.या उपक्रमात पोतराज वस्तीतील एकूण १६ कुटुंबीयांना फराळाची पाकिटे वाटप करण्यात आले.यावेळी वस्तीतील लोकांच्या चेहऱ्यावरील समाधानाचा भाव पाहायला मिळाला.

 

 

 

 

 

या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी विद्यार्थी देखील सजग झाले पाहिजेत व दातृत्वाची भावना देखील विकसित व्हावे, समाजातील काही घटक हे आजही अंधारात आहेत त्यांच्याही घरी आपल्यासारखीच दिवाळी साजरी व्हावी हा दृष्टिकोन ठेवून उपक्रमाची रचना करण्यात आली.
विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात पार पाडण्यात आला.