नांदेड दि. १८ नोव्हेंबर :- लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभा निवडणूक कामासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी नगरेश्वर मंदिर व मंगल कार्यालय, देगलूर याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पुढीलप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देगलूर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बालाजी सुरनर यांचा मोबाईल क्रमांक ९८८११८२८४६ आहे. मंडळ अधिकारी जी.पी. पदकोंडे यांचा मोबाईल क्रमांक ९६५७०९७०९८ असून देगलूर सज्जाचे तलाठी टी.जी. रातोळीकर असून त्यांचा मोबाईल क्रमांक ८००७९२९२६२ यांची नियुक्ती केली आहे.
तरी मतदान प्रक्रीयेसाठी १८ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या मुक्कामी कर्मचाऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे देगलूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.