देगलूर प्रतिनिधी,दि.२८:-दरवर्षीप्रमाणे यंदाही परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा झाला. तसेच २६/११ हल्ला दिनाचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली. त्यानंतर संविधान ग्रंथाचे पुजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या संविधान म्हटले व त्यानंतर मुंबई स्पोटातल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे सर हे होते तर
विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुरेशराव कुलकर्णी यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बद्दलची माहिती दिली.
संविधानाविषयी माहिती देताना प्रमुख वक्ते योगेश वझलवार यांनी म्हंटले की २०१५ मध्ये भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला या पूर्वी हा दिवस कायदा दिन म्हणून साजरा केला जात होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे
१९४६ मध्ये स्थापन झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली, हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे महत्त्वाचे आणि सर्वात ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी संविधान सभेला जवळपास तीन वर्षे
लागली. भारतीय संविधाना हे १,१७३६६ (इंग्रजी आवृत्ती) जगातील सर्वात मोठे लिखित संविधान होय. भारतीय संविधान तयार करण्यात २७१ जणांचे सहकार्य लाभले होते. सर्व प्रकारे संविधान लाखो लोकांसाठी शतकानुशतके भेदभाव, आर्थिक , राजकीय आणि सामाजिक बहिष्कार संपणारी एक शक्तीशाली
मुक्ती घोषणा म्हणून काम करते. असे म्हटले कार्यक्रमाचे आभार सुजित मुगुटकर यांनी मानले तर सुत्रसंचलन दत्तात्रय मिरलवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.