देगलूर दि.०७ : परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासपुरक मंडळ प्रमुख वसंत वाघमारे हे होते तर प्रमुख वक्त्या श्रीमती पांचाळ या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने व करण्यात आली. यानंतर आठवी वर्गातील आदित्य गायकवाड यांनी महापरिनिर्वाण दिना बद्दलचे गीत सादर केले.मुख्य वक्त्या श्रीमती राधिका
पांचाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची माहिती सांगताना तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे महत्त्वाचे आहे.
परदेशातील अध्ययन आणि अध्यापनातील त्यांचे अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नवचैतन्य निर्माण करणारे ठरलेले आहेत सेवा जवळून आदर दुरुन आणि ज्ञान आतुन असावे. हाडांची कांड व रक्ताचे डांबर केल्या शिवाय विद्येची सडक निर्माण होणार नाही. असे बाबासाहेबांच्या जिवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले.
या नंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेब यांच्या जिवन किती संघर्षमय होते याबद्दलची माहिती दिली. कुठल्याही प्रसंगी दृढ निश्चय केला पाहिजे. त्यातूनच मार्ग निघत असतो असे सांगितले. कार्यक्रमाचे
आभार सुजित मुगुटकर यांनी मानले तर सुत्रसंचलन दत्तात्रय मिरलवार यांनी केले. यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी जवळपास ७५ मीनीटाचे वाचन केले.